आज नेहमीप्रमाणे सकाळी ६:३० ला walking ला निघालो. यवलेवाडी चौकात एका पालात राहाणाऱ्या कुटुंबावर नजर गेली. सकाळी ६:३० ते कुटुंब आपले ते छोट घर आणि आजूबाजूचा परिसर शेणाने सारवत होत.
स्वताच घर नसताना अन तेही रस्ताच्या एकदम कडेला उभा केलेली हि झोपडी. पन त्यांची स्वच्छतेची धडपड मनाला खुप काही शिकवून गेली.
आज आम्ही Flat नावाच्या संस्कृतीत राहात आहोत. आम्हाला घरातला कचरा उचलायला सोसायटीचे कामगार हवेत. Flat समोरील व्हरांडा साफ करायला सुध्दा सोसायटी कामगार हवेत . कुठे चाललो आहोत आपण नेमके ? कोणती प्रतिष्ठा जपत आहोत आपण ?
आज आपले पंतप्रधान मोदी जनतेला स्वच्छतेचे आवाहन करत आहेत . अश्या झोपडीत राहून स्वच्छतेचा ध्यास घेणारे हेच या अभियानाचे खरे पालक आहेत.
स्वच्छता हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. आपण शिकत आहोत, दररोज तंत्रज्ञानाच्या गप्पा मारत आहोत , पन आपण आपला हा आत्माच हरवत चाललो आहोत.
Reviewed by Vaibhav Kavade
on
Sunday, February 28, 2021
Rating:


No comments: