जीवनात पहिल्यांदाच अमेरिकेतील कडाक्याची थंडी आणि अंग अक्षरशः करपवून काढणारा उन्हाळा अनुभवल्यानंतर जरा कुठे मनाला अल्हादायक करणारा स्प्रिंगची अर्थात वसंत ऋतूची सुरवात. आकाशातील रंगांची उधळण पाहिली होती. पण झाडं सुद्धा रंगांची उधळण अशी कशी करू शकतात ?हे स्प्रिंग फॉल फॉल मध्ये प्रत्यक्ष पाहत होतो, अनुभवत होतो. हिरव्या असणाऱ्या पानांचा रंग हळू हळू लाल पिवळा होत जाताना पाहणं म्हणजे स्वर्गसुखच. ही रंग उधळत होणारी पानांची गळती म्हणजे येणाऱ्या कडक्याच्या थंडीची निसर्गाला लागलेली चाहूलच जणू. निसर्ग करत असलेली तयारी.
आपल्याला आपल्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल लागू शकते का? जेणेकरून आपण अगोदरच तयारीला लागू. निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो हे खरंच आहे. आपण स्वतःला उत्तम जाणणे आवश्यक आहे जशी ही झाडे स्वतःला जाणत आहेत आणि पानांची गळती करत करत आहेत ती ही आपल्याला आनंद देत. खूप साऱ्या आठवणी मागे सोडत. स्वतःला जाणण्याची पद्धत ध्यान.
निसर्गाच्या या उधळण करणाऱ्या आनंदा सोबत आपले भारतीय सण एक एक करत जवळ येत होते. त्यात येणारा गणेशोत्सव म्हणजे तर निसर्गाच्या या आनंदासोबत तुमच्या माझ्या मनात आनंदाची उधळण करणारा अध्यात्मिक-धार्मिक भारतीय सण,
माझे मित्र नितीन बोरकर यांनी मुलांना जवळच्या एका मंदिरात होणाऱ्या गणपती मूर्ती बनवण्याच्या प्रशिक्षणात सहभाग घेण्यास प्रोत्साहित केले होते. त्यानुसार मुलांनी मंदिरात मातीचे छान गणपती बनवले होतें. हेच गणपती आम्ही गणेशोत्सवसाठी घरी बसावण्याचे ठरवले होते. लहान मुलांनी बनवलेली मूर्ती ती, तशी ओबड धोबड आकाराचीच पण त्या मूर्तिमध्ये मुलांची कला, बुद्धिमत्ता मात्र उठून दिसत होती. मुलांच्या मनातील भाव मूर्ती बनवताना त्या मूर्तीमध्ये उतरला होता. मूर्ती चक्क बोलत असल्याचा भास त्या मूर्ती कडे पाहताना होतं होता. अगदी मन प्रसन्न होतं होते.
गणेश चतुर्थीच्या दिवशी काव्या, वरद, आराध्या, अन्वी या चौघानी बनवलेली गणेश मूर्तीची घरी प्रतिष्ठापणा केली. काव्याने बनवलेली छोटी आरास उठून दिसत होती. सोसायटी मधील सर्वांनी मिळून गणेशाची आरती केली. दर्शन घेतले. अल्पपोहार केला सोबत भारतातील आठवणी, लहानपणीच्या गणेशोत्सव मधील आठवणी एकमेकांशी शेयर केल्या.
 |
| अमेरिकेतल्या घरी प्रतिष्ठापणा केलेली गणेश मूर्ती |
 |
| अमेरिकेतील सोसोयटी परिवार |
गणेशोत्सवाची धुमाधाम चालू असतानाच मित्र नितीन बोरकरांचा फोन आला. चला! जरा फिरून येऊ! पाच दहा मिनिटांनी जावू लगेच. असं बोलले. मी ही लगेच तयार झालो. अमेरिकेतल्या ब्लॅक फ्रायडे नावाच्या दुकानात आम्ही सहज गेलो, स्वस्तात काय मिळतय का बघायला. ब्लॅक फ्रायडे ही अमेरिकेतली अश्या दुकानाची साखळी आहे जिथं वस्तू स्वस्तात मिळतात, खास करून ज्या वस्तू ग्राहकांनी परत केलेल्या, किंवा चुकीच्या पत्त्यावर पोहचलेल्या किंवा काही अन्य वेगवेगळ्या कारणामुळे. अश्या सर्व वस्तू बल्क भावात ब्लॅक फ्रायडे विकत घेऊन त्या वस्तू ग्राहकांना विकते अगदी स्वस्तात 1 डॉलर पासून.....
ब्लॅक फ्रायडे दुकानात फिरत असताना एक चकाकाणारी वस्तू दिसली. थोडं जवळ जावून पाहतो तर काय, एका बॉक्स मध्ये सोनेरी रंगाचा गणपती. ब्लॅक फ्रायडे दुकानात फिरत असताना एक चकाकाणारी वस्तू दिसली. थोडं जवळ जावून पाहतो तर काय, त्या अडगळीत सोनेरी रंगाचा गणपती पडून होता आणि तो गणपती ज्या बॉक्स मध्ये होता त्यामध्ये एक लाफिंग बुद्धाही होता.
क्षणाचाही विलंब न लावता गणपती आणि बुध्दा विकत घेतला. अमेरिकेत गणेशोत्सव साजरा करत असताना ही गणपती मूर्ती मला अचानक दुकानात अडगळीत पडलेली असताना सापडली. काय योगायोग!!!!! माझे मन सरळ 2008 सालात गेले. 2008 साली माझा US visa interview यशस्वी पार पडल्यानंतर मी मुंबई मधील सिद्धिविनायक दर्शनाला गेल्यानंतर तिथून एक गणपती मूर्ती खरेदी केली होती, जी मी कायम स्वरूपी जपून ठेवली होती. जेव्हा केव्हा अमेरिकेला जाईन त्यावेळी सोबत असावी म्हूणन. 2008 साली मात्र हातातोंडांशी आलेली संधी हुकली. 2023 ला पुन्हा अशीच संधी चालून आली. ह्यावेळी येताना 2008 साली खरेदी केलेल्या गणपती मूर्तीला सोबत आणले होतेच. आणि आज 2024 साली अचानक मला ही नवीन गणपती मूर्ती एका अनोळखी दुकानात सापडावी का? जणू काही माझीच वाट बघत होती. मी ही गणपती मूर्ती घेतेली आणि नितीनने लाफिंग बुध्दा. दोघही खूप खुश झालो आणि आनंदाने घरी आलो.
संध्याकाळच्या आरतीला ही मला सापडलेली गणपती मूर्ती स्थानापन्न केली आणि मग घरातल्यांना सगळा प्रकार सांगितला. गणपती आणि बुध्दा दोघांचाही आशीर्वादच म्हणा ना! हा अश्या पद्धतीने चक्क अमेरिकेत मिळाला.
ऐटीत, ऐशोआरामात बसलेला हा गपणती पण धीर गंभीर विचार करत आहे असा वाटणारा, संपूर्ण मूर्तीत त्याचा मस्तकाचा भाग मात्र उठून दिसत होता. मस्तकातच त्या मूर्तीची संपूर्ण ऊर्जा जाणवत होती. अमेरिका म्हणजे ऐशोआराम, प्रतिष्ठा, संपत्ती, नाव, अनुभव अश्या अनेक सर्व काही गोष्टी. कोणासाठी ? तर ज्याचे मस्तक बुद्धीवान आहे फक्त अश्यांसाठी. आपल्या डोक्यातील ऊर्जा म्हणजेच आपले विचार. आपले विचारच आपल्याला घडवतात, बनवतात. विचार हीच आपली ऊर्जा आपली शक्ती ज्याद्वारे आपण मोठे होतो. चांगल आयुष्य जगतो.
अमेरिका म्हणजे बुद्धीवान लोकांचा प्रदेश. इथं बुद्धीला किंमत अन प्राधान्य आहे. फक्त अशीच लोकं इथं मोठी होतात. अमेरिका ही पैशाची खान फक्त कामगार लोकांसाठी. बुद्धीवान लोकं इथं पैसा अन प्रतिष्ठा दोन्ही कमवतात. आपल्या देशात माघारी गेल्यावर नवीन काहीतरी उभा करतात. ही गणपतीची मूर्ती असचं काहीतरी सांगत होती. बौद्धिक पात्रता वाढव. नव्या गोष्टी शिक. नवी संस्कृती, नवी लोकं बघ. अन माघारी फिरताना नवी बुद्धीमत्ता, कल्पना,संकल्पना घेयून जां. त्यासाठी सर्व जे काही लागतं ते इथं शिक माझ्यासमोर. भारतात जाताना सोबत मला ही घेयून जां. नव्या बुद्धीतून नवी कल्पना करणे, नवे विचार निर्माण करणे आणि नवे ध्येय साध्य करणे, यशाला गवसणी घालणे यासाठीच ब्रह्मांडाणे आपल्याला ईश्वरी बुद्धिमत्ता दिली आहे. ह्या आजच्या दिवसापासून मी माझ्यावर नव्या पद्धतीने काम चालू केले ईश्वरी बुद्धिमत्तेला सोबत घेतं.
2008 साली अमेरिकला येताना मुबंईच्या सिद्धिविनायक मंदिरातून गणपती घेतेलेला होता. आज 2026 साली जाताना मला हा अमेरिकेत सापडलेला गणपतीही सोबत असणार जणू काही अमेरिकेन माझ्यावर ठेवलेला कृपेचा वरदहस्तच. त्या ब्लॅक फ्रायडे दुकानात सपाडलेला हा गणपती यावरून ह्या गणपतीच नाव काळ्या शुक्रवारचा सोनेरी गणपती असं ठेवलं. तुमच्या, माझ्या उद्याच्या दिसणाऱ्या सोनेरी भविष्याकडे पहात........चालत रहा
No comments: