विदेशात जाणे आणि राहणे म्हणजे मज्जाच मज्जा, नुसता आनंद आणि सुख अशी समाजाची सर्वसाधारण भावना. माझी ही अमेरिकेला जाण्यापूर्वी अशीच भावना पण खर सांगू का? अमेरिकेत पहिल्याच दिवसापासून संघर्ष म्हणजे काय असतो जे प्रत्यक्ष अनुभवायला चालू झाले. हा संघर्ष म्हणजे कधीही न अनुभवलेला असल्याने मानसिक ताण, प्रचंड भीती, अस्वस्थता, एकलकोंडा निर्माण होतो. माणूस कितीही काळ विदेशात राहूदे त्याला त्या दरम्यान एक अनामिक भीती असतेच.
पहिले 1/2 महिने अश्याच अनामिक भीतीमध्ये मीही वावरत होतो. आपल्या सर्वांच्या जीवनात असा काळ येतच असतो. दुःख, भिती, निराशा अश्या भावनांचे काळे कुट्ट ढग मनी जमा झालेलं असतात. तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनात असे काळे ढग येत असतातच.
अश्याच वेळी भारतातून आणलेली ज्ञानेश्वरी माझ्या हाताला लागावी का? अमेरिकेत H4 वर असल्याने माझ्याकडे वेळच वेळ होता. तस मी 10 वीत असताना ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात वाचली होती. पण तेव्हा काय समजत?
ज्ञानेश्वरी उघडली पहिला अध्यायची दोन चार पाने वाचली अन अचानक मनात चमत्कार झालेला जाणवला. मनात जमा झालेले काळे ढग दूर होत आहेत असं जाणवलं. मनातील भीती दूर होत आहे असं जाणवलं. मनामध्ये असणारी नकारात्मकता तर जसा कापूस वाऱ्याने क्षणात उडून डोळ्यांना दिसेनासां होतो त्याप्रमाणे नकारात्मकता, भीती मनातून उडून कुठल्या कुठं दूर गेली.
ज्ञानेश्वरी मनाला मोठं करते हे जाणवलं. आपल्या मनाला कायमस्वरूपी टिकणारे समाधानाचे सौभाग्य मिळवून देते. ज्ञानेश्वरी आपल्या जीवनात आलेल्या काळ्या ढगान दूर करून सुखाचा, आनंदाचा, समृद्धीचा, जागृतीचा वर्षाव करते. अमेरिकेत त्या थंडीत बाहेर पडणार बर्फ आणि त्यातून मिळणारा आनंद सोबत ज्ञानेश्वरी वाचतानां मनाला मिळणारा आनंद दोन्ही एकाच वेळी मनाला अत्यंत ऊर्जावान बनवत होते.
ज्ञानेश्वरी मधील ओव्या, शब्द आपल्या मनावर दैवी संस्कार करतात. प्रकटीकरणाच्या/ मनिफेस्टच्या भाषेत सांगायवचे तर थोडक्यात स्वयंसूचना किंवा आत्मसूचना. ज्ञानेश्वरी मधील शब्द आपण उच्चारल्याने आपण आपल्या मनाशी एक प्रकारचे affirmation चं म्हणजे आपल्या मनाशीच बोलत असतो. ज्ञानेश्वरी मधील दैवी शब्द उच्चारल्याने मनावर संस्कार होणारच ना! सोबत मनात दैवी ऊर्जा निर्माण होणारचं ना. अश्यारीतीने ज्ञानेश्वरी वाचनाच्या पहिल्याच दिवशी affirmation's / स्वयंसूचना / आत्मसूचना म्हणजे काय हे ही मला अधिक चांगल्या पद्धतीने मला समजलं, उमगलं आणि स्वअनुभव ही मिळाला.
वाचनाच्या पहिल्याच दिवशी माझ्या मनाने शांतता अनुभली अन मनाने अशी काय उभारी घेतली की, मला माझा अमेरिकेतील उद्देश स्पष्टपणे दिसू लागला आणि त्यादृष्ठीने मी कामाला लागलो.
आता मनात कोणतीही भीती नसल्याने मनात उरलेला होता फक्त जोश आणि तीव्र भावनां अन निर्माण झाली होती जिद्द नवीन काहीतरी साध्य करून दाखवण्याची !
ज्ञानेश्वरी वाचताना माऊली पहिल्याच दिवशी आपल्या मनात मोठा चमत्कार घडवून आणतात, हे मात्र नक्की !
चालत रहा🏃♂️
Reviewed by Vaibhav Kavade
on
Friday, June 12, 2026
Rating:

खूप छान अनुभव या संदेशात खूप मोठा मार्ग आहे thank you 😊
ReplyDelete